रायपूर | छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये कडकनाथ कोंबडीवरुन वाद निर्माण झालाय. ही कोंबडी मुळची आपल्याच राज्याची आहे, असा या दोन्ही राज्याचा दावा आहे.
यासाठी आता जीआय नामांकन देणाऱ्या संस्थेकडे या दोन्ही राज्यांनी अर्ज केलाय. कडकनाथ कोंबडी औषधी गुणधर्मासाठी खुप प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यातील हि कोंबडी आहे, असा तेथील नागरिकांचा दावा आहे.
मात्र छत्तीसगड येथील दंतेवाडा भागातील वातावरण या कोंबडीसाठी पोषक आहे, असाही दावा केला जात आहे. आता या कडकनाथ कोंबडीचं नामांकन कुठल्या राज्याला मिळणार , ते पाहणं महत्वाचं आहे.
Comments are closed.