मुंबईतील पेपरफुटी प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
मुंबई | दहावीच्या पेपरसंबंधीतील धक्कादायक माहिती मुंबईतून समोर येत आहेत. बारावी केमेस्ट्रीचा पेपर शनिवारी मुंबईत फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे एका खासगी क्लासेसच्या शिक्षकानेच हा पेपर लिक केल्याचं समोर आलं आहे.
खासगी क्लासेस चालवणाऱ्या एका शिक्षकाने पेपर सुरू होण्यापूर्वीच तीन विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप हा पेपर सुरु होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे गोंधळ उडाला आहे.
याप्रकरणी खासगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विले पार्ले पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेपर फुटला नाही. प्रश्नपत्रिकेचं वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.
थोडक्यात बातम्या-
Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर
“कालची आलेली पोरं पवारांना टार्गेट करतायत हे मोदींना पटतं का?”
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनाबाबत ‘ही’ अपडेट आली समोर
सरकारची भन्नाट योजना, ‘इतक्या’ वर्षात तुमचे पैसे होतील डबल
देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
Comments are closed.