बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुक्त गावांमध्ये 10-12वीचे वर्ग पुन्हा सुरु होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकारेंनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनचे नियम शिथिल होत असले तरी सर्वांनी खबरदारी बाळगावी अशा वारंवार सूचना सरकारकडून दिल्या जात आहेत. अशातच राज्यातील जी गावं कोरोनामुक्त झाली आहेत, अशा गावांमध्ये दहावी-बारावीचे वर्ग सुरू करता येतील का? याविषयी चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज शिक्षण विभागाला दिले.

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यात ही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाय योजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील दहावी तसेच बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.

थोडक्यात बातम्या – 

“नरेंद्र मोदींचा त्यांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाही”

…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवता येईल – मोदी सरकार

सोन्याचा भाव आज पुन्हा उतरला, वाचा ताजे दर

काॅंग्रेसला बाजूला ठेवत राष्ट्रवादी तिसरा फ्रंट काढणार? पवारांच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

“भाजपच्या ‘या’ नेत्याने फडणवीसांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More