बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

1ली ते 4थी शाळा राहणार बंद?, ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

मुंबई | कोरोनाचा (Corona) प्रादूर्भाव काही प्रमाणात रोखण्यात सरकारला यश येत होतं, त्यातच ओमीक्रॉन (Omicron Varient) नावाच्या नव्या व्हेरीयंटने डोकं वर काढलं आहे. ओमीक्रॉन कोरोनाच्या तुलनेत 5 पटीने अधिक वेगाने पसरणारा व्हेरीयंट असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या व्हेरीयंटला रोखायचं कसं? हे आव्हान सरकारसमोर असणार आहे. त्यातच शाळा सुरु ठेवण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Muncipal Corporation) शिक्षण विभागाने पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ओमीक्रॉनची भीती वाढत असली तरी राज्य सरकार 1 डिसेंबरला शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं  सांगितलं होतं. मात्र, मुंबई महापालिकेने ओमीक्रॉनच्या संसर्गाच्या भीतीने महापालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, या निर्णयावर अजून शिक्कामोर्तब व्हायचं बाकी आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. आयुक्तांनी या निर्णयाला मान्यता दिल्यानंतरच येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान,  दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा शिरकाव होण्याची भीती वाढली आहे. संबंधित व्यक्तीने कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तसेच तो केपटाऊनवरून परतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या विषाणूच्या सुरूवातीलाच रोखण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

“शिवसेनेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा”, मनसेची मागणी

“कोलांटीउड्याच्या स्पर्धेत माकडही मागं पडतील, अधिवेशन आलं की यांची तब्येत बिघडते”

दिलासादायक! जगाला टेन्शन देणाऱ्या ओमिक्रॉनवर येणार प्रभावी लस

ट्विटरचा मोठा निर्णय, भारताचे पराग अग्रवाल नवे सीईओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More