मुंबई | शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तका खान यांचं रविवारी दुपारी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 89 वर्षांचे होते.
स्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी रविवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही देण्यात आला आहे.
दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि संगितकार ए. आर. रहमान यांनी उस्ताद गुलाम मुस्तका खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला केलाय.
थोडक्यात बातम्या-
पोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला!
“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”
आरोग्य विभागात ‘इतक्या’ हजार पदांची भरती होणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा
‘…तर भर चौकात त्यांना जोड्यानं मारू’; राम कदम आक्रमक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे ‘या’ दिवशी दिसणार एकाच मंचावर!