बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी 2002 साली गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना गुजरातमधील अहमदाबाद येथे हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या होत्या. त्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांवर आरोप झाले होते.

या दंगलीत तत्कालीन खासदार एहसान जाफरी यांच्यासह इतर 69 जणांच्या हत्या झाल्या होत्या. याप्रकरणी एसटीआयने नरेंद्र मोदींसह 64 जणांना क्लिन चीट दिली होती. एसटीआयच्या या अहवालाविरोधात एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकीया जाफरी यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वाेच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिन चीट दिली आहे. सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली गतवर्षी 9 डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती. हा निकाल राखून ठेवत, आज एसटीआयच्या अहवालावर शिक्कामोर्तब करत झाकीया जाफरी यांनी दाखल केलेल्या याचिकेत योग्यता नसल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकीया जाफरी यांचा हा खटला ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लढवला होता. सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती दिनेश माहेश्वरी आणि सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीनंतर पंतप्रधान मोदींना गुजरात दंगल प्रकरणी क्लिनचीट मिळाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘l love Uddhav Thackeray…’; प्रसिद्ध गायक लकी अलींची पोस्ट चर्चेत

शिंदे गटातील आणखी 5 आमदारांना मोठा झटका बसण्याची शक्यता!

“सरकार टीकेल किंवा जाईल पण शरद पवारांबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही”

राज्यातील घडामोडींवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

‘तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा’; शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More