एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं दुसरीकडे बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट!
मुंबई | एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं आणि दुसरीकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट मिळाल्याची माहिती आहे.
बच्चू कडू यांना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली आहे. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर हे आरोप झाले होते.
हे प्रकरण कोर्टात दाखल करण्यात आलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडू यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. संपूर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं कोतवाली पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. या प्रकरणाची फाइल आता अकोला पोलिसांनी बंद केली.
सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे.
थो़क्यात बातम्या-
महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस
सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
मोठी बातमी! बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांविषयी शनिवारी मार्गदर्शन सत्र, वाचा सविस्तर
सर्वात मोठी बातमी! औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर
Comments are closed.