तहसीलदाराला मारहाण करणाऱ्या लिपिक महिला कर्मचाऱ्याचे निलबंन

गोदिंया | सालेकसा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पांडे यांना मारहाण केलेल्या लिपिक वर्षा वाढई यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलं आहे.

वाढई आणि नायब तहसीलदार आय.आर पांडे यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यातून वर्षा यांच्याकडून पांडे यांना मारहाण करण्यात आली. 

याप्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. तसेच घडलेल्या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेशही दिले आहेत.

वाढई यांच्यावर कर्तव्यात कसूर करणे, दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार न पाडणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, मारहाण करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-नगरमध्ये उसाला आग; शेतकऱ्यांचं लाखो रूपयांंचं नुकसान!

-दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही!

-तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

-विनोद तावडेच म्हणतात शिक्षक-प्राध्यापक चोर; अजित पवारांचा गौप्यस्फोट