Clock App | जर तुम्ही आयफोन (iPhone) वापरत असाल आणि त्यात अलार्म (Alarm) लावून निश्चिंतपणे झोपला असाल तर तुमच्यासोबत फसवणूक (Cheating) होऊ शकते. बहुतेक लोक आयफोनमध्ये सकाळी उठण्यासाठी अलार्म लावून झोपतात पण उठल्यानंतर त्यांना कळते की ज्या वेळी उठायचे होते तो वेळ निघून गेला आणि अलार्म तर वाजलाच नाही. पुन्हा एकदा आयफोन वापरकर्त्यांना (iPhone Users) या समस्येचा सामना करावा लागत आहे. (Clock App)
नवीन अपडेटमध्येही (Update) समस्या कायम
नुकतेच ॲपलने (Apple) आयफोनसाठी लेटेस्ट अपडेट (Latest Update) रोल आउट केले आहे. आयफोनचे लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट (Latest Software Update) iOS 18.2.1 आहे. मात्र, लेटेस्ट अपडेटनंतरही काही वापरकर्त्यांना फोनमध्ये समस्या येत आहेत ज्याचा संबंध क्लॉक ॲपमधील (Clock App) अलार्मशी (Alarm) आहे.
नवीन अपडेट करूनही अलार्म वेळेवर न वाजण्याची समस्या सुटलेली नाही.
अलार्ममध्ये (Alarm) पुन्हा बिघाड
ही काही नवीन बाब नाही, पुन्हा एकदा आयफोनच्या क्लॉक ॲपमध्ये (Clock App) अलार्म विभागात (Alarm Section) गडबड पाहायला मिळत आहे. यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये वापरकर्त्यांना (Users) अशाच समस्येचा सामना करावा लागला होता. त्यावेळी कंपनीला इन-बिल्ट अलार्म फीचरमध्ये (In-Built Alarm Feature) गडबड असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर कंपनीने ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते. बराच कालावधी लोटल्यानंतरही पुन्हा एकदा वापरकर्त्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यामुळे लोकांना कामावर जाण्यास उशीर होत आहे. (Clock App)
एप्रिल 2024 मध्येही अशीच समस्या आली होती. कंपनीने ती सोडवण्याचे आश्वासन दिले होते, पण पुन्हा एकदा युजर्सना याच समस्येचा सामना करावा लागत आहे.
सोशल मीडियावर (Social Media) तक्रारींचा पाऊस
Reddit सारखे सोशल फोरम (Social Forums) आयफोन अलार्मशी संबंधित तक्रारींनी (Complaints) भरले आहेत. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की ॲपल (Apple) अद्याप या समस्येचे मूळ कारण शोधू शकलेले नाही. Reddit वापरकर्त्याचे (Reddit User) म्हणणे आहे की अलार्म वेळेवर न वाजल्यामुळे ते उठू शकले नाहीत आणि यामुळे त्यांची नोकरी (Job) गेली. याशिवाय अलार्मच्या भरवशावर झोपलेल्या काही वापरकर्त्यांचे पेपर (Exams) चुकल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत.
सोशल मीडियावर युजर्स या समस्येबद्दल तक्रारी करत आहेत आणि ॲपलला लवकरात लवकर या समस्येचे निराकरण करण्याची विनंती करत आहेत.
कोट्यवधींची कंपनी, पण समस्या जैसे थे
अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होत आहेत की ज्या कंपनीचे कोट्यवधींचे मूल्य (Valuation) आहे ती या समस्येपासून वापरकर्त्यांना अद्याप का मुक्त करू शकली नाही. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार (Media Reports), ॲपलच्या (Apple) नवीन iOS अपडेट 18.3 मध्ये या समस्येतून सुटका मिळू शकते. (Clock App)
Title: Clock App problem iPhone Alarm Glitch