Top News मुंबई

मुख्यमंत्र्यांवर 12 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, राज्यपालांकडे चौकशीची मागणी

मुंबई | शुक्रवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना निवेदन दिलंय. या निवेदनात 22 एकर जमीनीच्या खरेदी व्यवहाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलीये.

सोमय्या त्यांच्या निवेदनात लिहितात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबईत ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने 22 एकर जागा अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना कोणत्याही पातळीवर चर्चा झाली नव्हती, रुग्णालय उभारण्याबाबतचा आवश्यक तो अहवालही तयार करण्यात आला नव्हता.

या सर्व प्रक्रियेत असं दिसतं की कोणती जमीन अधिग्रहित करायची याचा निर्णय आधीच झाला असावा. त्यानुसार मुलुंडची जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने पार पाडली गेली, असंही निवदेनात नमूद करण्यात आलंय.

तर हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे. हा घोटाळा 12 हजार कोटींचा असावा, असा संशय आहे. या रुग्णालयाच्या उभारणीचा खर्च मुंबईकरांनी भरलेल्या कराच्या रकमेतून होणार आहे. मुंबईकरांनी हा भुर्दंड का सोसावा? असा प्रश्न विचारत या संपूर्ण व्यवहाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याची मागणी केलीये.

महत्वाच्या  बातम्या-

“भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही”

“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”

“2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता…”

काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!

“देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या