“चित्रपटात दाखवतात ते पोलीस आणि प्रत्यक्षातले पोलीस यांच्यात जमिन आस्मानाचा फरक असतो”
नाशिक | मागील एका महिन्यापासून मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारची मोठी कोंडी झाली होती. त्यानंतर आता चित्रपटात दाखवतात ते पोलीस आणि प्रत्यक्षातले पोलीस यांच्यात जमिन आस्मानाचा फरक असतो, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मंगळवारी नाशिकच्या पोलीस प्रबोधिनीत 118वा दिशांत सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या भावी अधिकाऱ्यांना संबोधित केलं. चित्रपटात दाखवतात ते पोलीस आणि प्रत्यक्षातले पोलीस यांच्यात जमिन आस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावं लागतं. पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळं प्रसंगावधान बाळगणं महत्वाचं असतं, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
तेरा महिने प्रशिक्षणातून तुम्ही सुदृढ शरीर कमावलेलं आहे. सेवा करताना पोलिसांना नेहमी नव्या भुमिका घ्याव्या लागतात. त्यामुळे सेवेसाठी निरोगी आणि निकोप मन देखील आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेत. खडतर प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर जल्लोष तर होणारच पण बेहोश होऊन चालणार नाही. तुमच्या परिवारासोबत आता महाराष्ट्राची जबाबदारी देखील तुमच्यावर आहे, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मागील काही काळापासून गुन्हेगारीचं स्वरूप बदलत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीच्या गुन्हात वाढ होत आहे. त्यामुळं या गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कारकिर्द असणारे अधिकारी म्हणून तुम्ही सेवा बजावाल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
थोडक्यात बातम्या-
मी मोठा भाऊ आहे, हात उचलला म्हणजे…’; त्या व्हायरल व्हिडीओवर बाबुल सुप्रियोंचं स्पष्टीकरण
‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’च्या फायनलवर कोरोनाचं सावट; गोलंदाजांना फटका बसण्याची शक्यता
सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं
धक्कादायक! तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच पोलिसांनी केली मारहाण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.