पुणे महाराष्ट्र

मनसे नगरसेवकावर अजित पवार भडकले, म्हणाले…

पुणे | फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले.

एव्हढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला, ऐकूणच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलंच कशाला, असा सवाल नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी अजित पवारांच्या वर्तणुकीवरही नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो कोविड सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी केली.

याच दौऱ्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षाच्या गट नेत्यांनाही आमंत्रित केलं होतं. त्यानुसार आपण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हेही उपस्थित होते. मात्र अजित पवारांनी एकूण घेणं तर दूरच उलट एकेरी उल्लेख करत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचं म्हणत मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी अजित पवारांच्या वर्तवणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पावसामुळे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील छताचा भाग कोसळला

पाच दिवसात सोने दरात मोठी वाढ; पाहा काय आहे आजचा भाव…

परदेश शिष्यवृत्तीबाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

‘या’ तारखेपासून शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार

सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या