मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी वाजवला ‘युतीचा नगारा’?

वाशिम | आगामी लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना आणि भाजपची युती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण वाशिममधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र नागारा वाजवला आहे.

वाशिममधील पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात विकासकामं आणि काही भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी दोघांनी उपस्थिती लावली. त्यावेळी दोघांनी वंजारा समाजाचं पारंपारिक वाद्य नागाऱ्याचं वादन केलं. 

निवडणुकांच्या तोंडावर दोघांचे एकत्र येणे आणि नगारा वाजवणे म्हणजे युतीचे संकेत असल्याचं बोललं जात आहे. 

दरम्यान, शिवसेनेनं निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा अनेकदा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची नक्की भूमिका कोणती असेल?, यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मुंबईतील मराठी माणसांसाठी काहीच केलं नाही!

-शरद पवार नारायण राणेंच्या घरी; राणे खरंच राष्ट्रवादीसोबत जाणार???

-आला रे आला… मराठमोळा टच असलेला ‘सिम्बा’चा ट्रेलर आला!

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल; आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा

-वादग्रस्त व्हीडिओ प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटकेंना पहिला झटका!