मुंबई | तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 50 लाख रुपये जाहीर केले आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी विनंती केली होती. ही विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे.
स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या जिंजी किल्ल्यास आज छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. जिंजी किल्ल्याला भेट दिल्यानंतर मा. मुख्यमंत्री यांच्याशी याविषयी फोनवर सविस्तर चर्चा केली, असं खासदार संभाजीराजेंनी सांगितलंय.
महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा संपूर्ण देशभरात पसरलेल्या आहेत. त्यांचं जतन, संवर्धन, आणि प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिंजी किल्ल्यावरील राजसदरेच्या संवर्धनासाठी याठिकाणी मराठा हिस्ट्री गँलरी उभारणीसाठी तात्काळ 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहेत, अशी माहिती संभाजीराजेंनी दिलीये.
महत्वाच्या बातम्या-
राज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं- उद्धव ठाकरे
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप
“यापुढे राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं”
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना!
प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितली इतक्या दिवसांची मुदत
Comments are closed.