शरद पवारांच्या गोलंदाजीनंतर क्रिकेटच्या मैदानात देवेंद्र फडणवीसांची फलंदाजी

नागपूर | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा मंचावरून फटकेबाजी करताना पाहिलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही मैदानात बॅटने फटकेबाजी करताना पाहिलं आहे का? 

नागपूरात मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात ‘CM चषक’चे आयोजन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.

उद्घाटनावेळी क्रिकेटची खेळपट्टी आणि बॅट पाहिल्यावर मुख्यमंत्र्यांना फलंदाजीचा मोह अनावर झाला. त्यानंतर त्यांनी फलंदाजीचा आनंद घेतला.

दरम्यान, काही  दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या गोलंदाजीची चर्चा रंगली होती. आता राज्याच्या राजकारणात नवीन फलंदाजही पहायला मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी उद्धव ठाकरे आता पंढरपूर दौऱ्यावर!

-सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं- नरेंद्र मोदी

-आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर

-कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद