मुंबई : वाहतूक नियमभंगासाठी केंद्राने लागू केलेली दंडवाढ अमलात येणारच, असा पवित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दंडाची रक्कम सौम्य करण्याचे संकेत दिले आहेत. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या दंडस्थगितीच्या एकतर्फी निर्णयाबद्दलही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
स्थगितीचा निर्णय हा धोरणात्मक असून रावते यांनी तत्पूर्वी माझ्याशी आणि मंत्रिमंडळाशी चर्चा करणं अपेक्षित होतं. पण मित्र पक्षाच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांना सांभाळूनही घ्यावं लागतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
याआधी दंडाची रक्कम किरकोळ होती. त्यामुळे धाक राहिला नव्हता. वाहतूक नियमभंगामुळे गंभीर अपघात घडल्याची आणि त्याविषयी तक्रारी आल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या दंडाची आवश्यकता होती, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दंड किती असावा, याविषयी दुमत असू शकेल. तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असू नये. पण दंडाचा धाक वाटेल, इतका तो असला पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या-
पक्षातील गटबाजीला आळा घालण्यासाठी काँग्रेसने केले ‘हे’ मोठे फेरबदल – https://t.co/2109T2OuwD @INCIndia
— थोडक्यात (@thodkyaat) September 16, 2019
माझ्यात आणि शिवेंद्रराजेंमध्ये राष्ट्रवादीची लोक भांडणं लावत होती- उदयनराजे – https://t.co/s4GJL6kHEZ @Chh_Udayanraje @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) September 16, 2019
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर भारत देशही नसता- सतीश पूनिया – https://t.co/3lXmvOHZJm @PMOIndia @BJP4India
— थोडक्यात (@thodkyaat) September 16, 2019
Comments are closed.