मुंबई | आपल्या स्वत:च्या सोयीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदुत्व वापरतात. त्यांनी स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी हिंदुत्वाची व्याख्याच बदलेली दिसत असल्याची भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
25 ऑगस्ट रोजी विजयादशमीच्या दिवशी दसरा मेळव्यात मुख्यमंत्र्यासह अनेकांनी भाषणं केली. त्यावेळी सरसंघचालकांनी भाषणात एक वक्तव्य केले होते, “हिंदू, हिंदूत्व, हिंदूराष्ट्र इसको ले कर भ्रम पैदा करने वाले लोग है”, ते वक्तव्य मुळात तुमच्यासाठी होतं, असं म्हणत चंंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणं उद्धव ठाकरे विसरले आहेत. तुमचा हा सगळा आटापिटा आपली सत्ता राखूण ठेवण्यासाठी हिंदूत्वाचा वापर कतर आहात,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, कोरोनाबाबत भाषणात चिडीचुप बसलात, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलला नाहीत. केवळ भाषणबाजी करुन काहीही होणार नसल्याचं पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
नितीश कुमार शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेत; तेजस्वी यादव यांचा टोला
पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!
पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम प्रभावी होईल; ‘या’ खासदाराने व्यक्त केली खदखद
‘…असं सरसंघचालक मोहन भागवत कधीच सांगणार नाहीत- शिवसेना
योग्य वेळ आली की शिवसैनिकच नारायण राणेंना उत्तर देतील- अशोक चव्हाण