मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक; आज ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता
मुंबई | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने हळूहळू निर्बंध शिथील करत सर्व काही चालू करण्यास सुरुवात केलीये. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 जुलैपासून दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल चालू होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. त्यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात 29 जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत बैठक बोलवली होती. टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आले होते. राज्यातील 27 जिल्हयांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले, तर 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवण्यात आले होते, त्यानंतर सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर आता 10 दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे.
काल मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना प्रार्थनास्थळे, रेस्टाॅरंट आणि माॅल लवकरच सुरू करू, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता आजच्या बैठकीत मुख्यमंत्री प्रार्थनास्थळे, रेस्टाॅरंट आणि माॅल उघडण्यावर चर्चा करणार आहेत. आज रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक होणार आहे. त्यावेळी मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील हाॅटेलला देखील रात्री उशिरा 10 पर्यंत परवानगी मिळावी, यासाठी आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीत भूमिका मांडणार असल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर सिनेमाचं तिकिट आणि पाॅपकाॅर्न मिळणार फ्री’; पीव्हीआरची भन्नाट ऑफर
मनसेकडून ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचं स्वागत!
रोख व्यवहार करणाऱ्यांनो वेळीच व्हा सावधान; 10 व्यवहार केल्यानंतर….
भारत रशिया पंतप्रधानांची आज भेट; मोदी-पुतिन भेटीकडं जगाचं लक्ष
‘…तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार’; इम्तियाज जलिल यांचा इशारा
Comments are closed.