बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, केला मोठा निर्णय जाहीर

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार मंत्री उदय सामंत तसंच रायगडच्या पालकमंत्री आदित्य तटकरे उपस्थित होत्या.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.

शासनाने दिलेली मदत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. संकट कितीही गंभीर असले तरी सरकार जनतेसोबतच आहे. कोकणातील फळबागांचे चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले असून फळबागा वाचविण्यासाठी निश्चित धोरण लवकरच आखण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारट्टीलगतच्या गावांचं मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पाहणी केल्यानंतर नुकसानग्रस्तांना मदत देखील जाहीर केली आहे. मात्र ही मदत खूपच तोकडी असल्याचं म्हणत आणखी मदत करण्याची आवश्यकता असल्याचं मत विरोधी पक्षनेत्यांनी मांडलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

पुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

“महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत”

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानवर होत असलेल्या आरोपांवर सलीम खान म्हणाले…

ठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका

पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More