महाआघाडीचे पंतप्रधान कोण असतील? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली ‘ही’ नावं… पाहा व्हीडिओ

महाआघाडीचे पंतप्रधान कोण असतील? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली ‘ही’ नावं… पाहा व्हीडिओ

मुंबई | सोमवारी मायावती, मंगळवारी ममता, बुधवारी अखिलेश, गुरूवारी चंद्राबाबू, शुक्रवारी केजरीवाल, शनिवारी स्टॅलीन आणि रविवारी सुट्टी असल्याने शरद पवार पंतप्रधानपदी असतील, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर केला आहे.

परिवर्तन कुणीही घडवू शकत नाही. परिवर्तन घडविण्यासाठी ‘सागराच्या छातीवर रक्ताचा लेख’ लिहावा लागतो, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाना साधला केला आहे.

महागठबंधन तर केलं… मात्र त्यांचा पंतप्रधान पदाचा नेता कोण?, असा प्रश्नही त्यांनी विरोधी पक्षाला विचारला. पुढे थोड्या वेळातच त्यांनी या प्रश्नाचं अतिशय मिश्मिल पण तितक्याचं बोचऱ्या शब्दांत उत्तरही दिलं.

केवळ सत्तेचे लचके तोडण्यासाठी एकत्रित आलेली लोकं या देशामध्ये परिवर्तन घडवू शकत नाहीत, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या-

आज राष्ट्रवादी आपले सगळे पत्ते उघडे करणार?, मुंबईत बोलावली महत्वाची बैठक

राहुल गांधीनी साधलं ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य! म्हणतात… नफरत से नही प्यार से जीतेंगे

‘ढोंग आणि बढाया’ हेच मोदी सरकारचं तत्वज्ञान, सोनिया गांधींचा बोचरा वार

‘RSS हा बेलागम घोडा’, प्रकाश आंबेडकरांची मालेगावच्या सभेत ‘RSS’वर सडकून टीका

होय, मी राज ठाकरेंची भेट घेतली… भेट घेण्यात गैर काय?- अजित पवार

Google+ Linkedin