Top News

… तर ‘त्या’ दिवशी शरद पवार पंतप्रधान होतील- देवेंद्र फडणवीस

मुंबई |  महाआघाडीची सत्ता आली तर त्यांच्याकडे पंतप्रधान पदासाठी नेता नाही. दरदिवशी पंतप्रधान बदलेल आणि ‘सुट्टीच्या दिवशी’ शरद पवार पंतप्रधान होतील, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.

शरद पवार तामिळनाडूत गेले तर त्यांच्या सभेला चार माणसेही जमणार नाहीत, अशीही टीका त्यांनी पवारांवर केली.

कितीही नेते एकत्र आले तरी मोदींजींना काहीही फरक पडणार नाही. बाकीचे नेते त्यांच्या इलाक्यातलेच नाहीत, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

दरम्यान, महाआघाडीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच विराजमान होतील असा विश्वासही व्यक्त केला.

 महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदी राजकारणातून निवृत्त झाल्यास मी पण राजकारण सोडेन- स्मृती इराणी

“गाय एक जनावर आहे तिला माता म्हणणाऱ्यांच्या डोक्यात शेण भरलंय!”

“शिवसेनेला अण्णांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं”

-महाघोटाळा दडपला; ‘डीएचएफएल’ने फाडली भाजपची 20 कोटींची पावती!

खासदार संजयकाका पाटलांनी आमदार सुरेश खाडेंना भर सभेत झापलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या