Top News

मी पुन्हा येईन…. याच निर्धारानं… नव महाराष्ट्र घडवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस

मुंबई | आज(मंगळवार) फडणवीस सरकारच्या कार्यकाळातल्या शेवटच्या अधिवेशनाची सांगता झाली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाला संबोधित करताना आमचं सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणात मी पुन्हा येईन.. याच निर्धारानं, याच भूमिकेत,याच ठिकाणी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पाच वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या बिलांवर विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने मी विरोधी पक्षाचे आभार मानतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

दरम्यान, मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नव महाराष्ट्र घडवण्यासाठी याच सभागृहात पाऊल ठेवेन, असं अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-…तर रोहित शर्माला शतक करताच आलं नसतं!

-पावसाळा घेऊन येतो कंबरदुखी; वाचा कारणं आणि करा उपाय

-वडिल काँग्रेसकडून 33 वर्ष खासदार; मुलगा करणार भाजपमध्ये प्रवेश

-रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताचं बांगलादेशला 315 धावांचं आव्हान

-पेरणी करताना विजेच्या धक्क्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू; पोराला साहेब करायचं स्वप्न अधुरं…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या