…आणि मुख्यमंत्री फडणवीस चुकून दुसऱ्याच गाडीत बसले!

अहमदाबाद | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर ते बाहेर पडले आणि चुकून दुसऱ्याच गाडीत बसले. फडणवीसांना पत्रकारांनी गराडा घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. गोंधळात दुसऱ्याच गाडीत जाऊन बसले.

मुख्यमंत्री गाडीत बसल्यानंतर गाडीचा ड्रायव्हर चुकीचा असल्याच लक्षात त्यांच्या आलं. त्यांनी त्या गाडीतून लगेच काढता पाय घेऊन उतरले आणि दुसऱ्या गाडीत जाऊन बसले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचं समजतंय.