कोल्हापूर महाराष्ट्र

राजकारणात कुणीही पर्मनंट नसतं; लोकांनी अनेक दिग्गजांना घरी बसवलंय- फडणवीस

कोल्हापूर |  कोणत्याही क्षेत्रात कोणताही माणूस सदा-सर्वकाळ नसतो म्हणजे पर्मनंट नसतो. राजकारणात जे भरकटले गेले त्यांना लोकांनी घरी बसवलंय, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

कोल्हापुर जिल्ह्यातील कागलमध्ये एका कार्यक्रमसाठी मुख्यमंत्री आले होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते हसन मुश्रीम यांच्यावर नाव न घेता टीका केली.

राजकारणात 5 वर्षासाठी जनता निवडून देते. पण काही लोकं अमरत्व प्राप्त झाल्यासारखे वागतात, असं म्हणत त्यांनी मुश्रीफांना टोला लगावला.

दरम्यान, राजकारणात फक्त लोकांसाठी काम करत रहायचं. चांगलं काम केल्यावर समाज नक्की आपल्या पाठिशी उभा राहतो, असं देखील त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

-राष्ट्रवादीचं माझ्याकडे कोणतही पद नाहीये पण मान आणि सन्मान आहे- छगन भुजबळ

-दिशाबाबत विचारताच आदित्य ठाकरे लाजले!

-माढ्याच्या खासदारांनी घेतली उदयनराजेंची भेट; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

-महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे; संजय राऊतांच्या अनोख्या शुभेच्छा

-…म्हणून रिषभ पंतला भारतीय संघासोबत राहता येणार नाही, ड्रेसिंग रुममध्येही नो एन्ट्री!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या