भीमा कोरेगावच्या हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री काय काय म्हणाले?

मुंबई | भीमा कोरेगावच्या हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदा जाहीर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय?

-भीमा कोरेगावच्या हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून चौकशी करणार

-दंगलीचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी सजगता बाळगली त्यामुळे डाव उधळला गेला

-गाड्यांची जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. मात्र पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली

-जाळपोळ आणि दगडफेकीमुळे काही नागरिक याठिकाणी अडकून पडले होते. रात्री सर्वांना बसमध्ये बसवून सुखरुप घरी पोहोचवण्यात आलंय

-एका तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. हे असले प्रकार कोण जाणीवपूर्वक करतंय याचा सरकार छडा लावणार आहे

-तरुणाच्या मृत्यूची हत्या समजून सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच्य त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल

-ज्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे, त्यांनाही राज्य सरकारकडून मदत करण्यात येईल

-माध्यमांनी संयम दाखवल्यामुळे अफवा पसरल्या नाहीत त्यामुळे त्यांचे आभार मानतो, मात्र सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे

-राज्यातील जनतेने संयम बाळगावा, खोटी माहिती किंवा अफवा कोणीही पसरवू नये

-समाजात तेढ निर्माण होईल, अशी विधानं कुणीही करु नयेत. पक्षनेतृत्वांनी संयम बाळगावा

-महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे. जे लोक यांना मानतात त्यांनी जातीयतावाद पसरणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे