मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कलाकारांचं तौडभरुन कौतुक केलं!

नवी मुंबई | आमदार मंदा म्हात्रे यांनी नुकतेच नवी मुंबई उत्सवाचे आयोजन केले होते. अभिनेता सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी या भव्य कार्यक्रमात सादरीकरण केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे असलेल्या या उत्सवाची सुरुवात अभिनेता लॉफी पॉल व ICACTच्या डान्सर्सच्या गणेश वंदनेने झाली. ‘देवा श्रीगणेशा’ गाण्यावर भरतनाट्यम करत अभिनेता लॉफी पॉल आणि टीमने नेत्रदीपक नृत्य सादर केलं.

ही गणेशवंदना पाहून मुख्यमंत्र्यानी अभिनेता लॉफी पॉल व ICACTच्या महागुरू मेरी पॉल, चेअरमन मॅक मोहन पॉल तसेच डान्सर्सचे विशेष कौतुक केले.

दरम्यान, ICACT संस्था गेले ३० वर्षांपासून नवी मुंबई परिसरात नृत्य प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असून आता पर्यंत तब्बल ४५ हजाराहून जास्त विद्यार्थी येथून प्रशिक्षण पूर्ण करून गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-“लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का?”

-“नागपूरचं वासेपूर करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे”

-राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; पुण्यात या विद्यापीठाला स्वायत्त मान्यता

-मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे- राधाकृष्ण विखे पाटील

-शरद पवारांना मोठा धक्का; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला हा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या