फडणवीसांची लाडकी बहीण विधानपरिषदेवर; ‘या’ बहिणीला गिफ्ट मिळणार?

Maharashtra

Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. मात्र यावेळी भाजपने महायुती या घटक पक्षांतर्गत विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे राज्यात महायुतीची पुन्हा एकदा सत्ता आली आहे. दरम्यान, महायुतीला लाडक्या बहि‍णींनी भरभरुन मतदान केल्याचा फायदा झाला आहे. मात्र अशातच आता लाडक्या बहिणींमुळे महायुतीला मोठा विजय मिळाल्याने भाजपाच्या महिला नेत्या विधानपरिषदेवर दावा करत आहेत.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार :

विधानसभा निवडणूकीमध्ये महिलांच्या वाढलेल्या मतदानामुळे भाजपच्या नेत्या निलीमा बावणे यांनी भाजप पक्षाकडे विधानपरिषदेवर घेण्याची आग्रही मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरताना देशील निलीमा बावणे या प्रस्तावक म्हणून होत्या. कारण गेले अनेक वर्षे भाजप पक्षासोबत आणि सामाजिक जीवनात काम करत असल्याने दावेदारी प्रबळ असल्याचा दावा निलीमा बावणे यांनी केला आहेत.

मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निलीमा बावणे यांना तिकीट देण्यात आले नाही, त्यामुळे आता निलीमा बावणे भाजप पक्षाकडे विधानपरिषद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच निलीमा बावणे या यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत.

Maharashtra l निलीमा बावणे कोण आहेत? :

मध्य भारतात दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही गरजूंसाठी हक्काची पतसंस्था आहे. ही पतसंस्था निलीमा बावणे यांनी सुरु केली आहे. या पतसंस्थेत सुरुवातीला 50 रुपये जमा करुन, बचत करुन गटामार्फत आर्थिक व्यवहार झाले. मात्र त्यानंतर 1994 पासून ही पतसंस्था सुरू झाली.

या पतसंस्थेचे सव्वा लाखांहून अधिक सभासद देखील आहेत. तसेच आता ही पतसंस्था मल्टीस्टेट झाली आहे. तिच्या शाखा राज्यातच नाही तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये देखील आहेत. तसेच निलीमा बावणे यांची सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. कारण राज्यातील महिलांना स्वालंबी करण्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले आहेत. परंतु आता त्यांनी विधान परिषदेवर दावा केला आहे.

News Title – CM Devendra Fadnavis given opportunity to Nilima Bawane on the Legislative Council? 

महत्त्वाच्या बातम्या-

वर्ल्ड चॅम्पियन गुकेशची नेटवर्थ किती?, आकडा ऐकून चकित व्हाल

दत्त जयंती 14 की 15 डिसेंबरला; जाणून घ्या नेमकी कधी?

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?, दिल्लीत भाजप व शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्यांची गुप्त भेट

काळजी घ्या! राज्यात ‘या’ तारखेपासून गारठा वाढणार?

गेल्यावर्षी 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने मिळणारं सोनं आज पोहोचलं ‘इतक्या’ हजारांवर!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .