नागपूर | औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतर करण्यासाठी तत्कालीन युती सरकारच्या काळात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. याचा पाठपुरावा करु, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहरांची नावं बदलण्याचा धडाका लावला आहे. गुजरात सरकारनेही अहमदाबादचं नाव कर्णावती करण्याचा विचार असल्याची घोषणा केली आहे.
त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना नागपुरात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरासाठी आपण अनुकूल असल्याचं त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करु आणि शहरांची नावं बदलू, असं ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-भाजपऐवजी जेडीयूमध्ये का प्रवेश केला?; पाहा काय म्हणाले प्रशांत किशोर…
-सिंचन घोटाळा प्रकरण; अजित पवारांबाबतची भूमिका न्यायालयात मांडू- मुख्यमंत्री
-प्रशांत किशोर यांचं नवं भाकीत; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी झटका!
-भारतानं ‘खेलरत्न’ नाकारला; तोच बजरंग जागतिक क्रमवारीत अव्वल!
-…म्हणून भाऊ कदम यांनी आगरी-कोळी समाजाची हात जोडून माफी मागितली!
Comments are closed.