पुरुष झालेली ‘ती’ सेवेत कायम राहणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश

बीड | लिंग बदल करण्यासाठी सुट्टी मागणाऱ्या तसेच सेवेत पुन्हा रुजू करुन घेण्याची मागणी करणाऱ्या बीडच्या महिला पोलिसाचा सहानुभूतीने विचार करावा. तसेच तिला पुन्हा सेवेत रुजू करुन घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याला दिल्या आहेत. 

बीडच्या महिला कॉन्स्टेबलने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे यासंदर्भात अर्ज केला होता. मात्र त्यांनी तो अर्ज पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे पाठवला होता. नियमांकडे बोट दाखवत त्यांनी ही मागणी नाकारली होती. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालत या महिला पोलिसाबद्दल सहानुभूतीने विचार करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे पुरुष झालेल्या ‘ती’चा सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा झालाय.