विठ्ठलाच्या कृपेनं निलंग्याच्या हेलिकॉप्टर अपघातातून वाचलो!

पंढरपूर | विठ्ठलाच्या कृपेनं निलंग्याच्या हेलिकॉप्टर अपघातातून वाचलो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पंढरपुरात कृषीप्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

निलंग्यात हेलिकॉप्टर अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी एका गावात कीर्तनाला गेलो होतो. तिथल्या कीर्तनकारांनी मला विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट दिली होती. हेलिकॉप्टर अपघात झाला तेव्हा मुर्ती माझ्या सोबत होती. हेलिकॉप्टरचं नुकसान झालं मात्र मूर्तीला धक्काही लागला नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या