हॉटेल मालकांवर कारवाई होणार, अनधिकृत हॉ़टेल्सही पाडणार!

हॉटेल मालकांवर कारवाई होणार, अनधिकृत हॉ़टेल्सही पाडणार!

मुंबई | लोअर परेलच्या कमला मिल कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीच्या घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. तसेच या भागाची पाहणीही केली. 

हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. तसेच 5 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पालिका आयुक्त अजॉय मेहता यांची चौकशी समिती याप्रकरणी नियुक्त करण्यात आलीय. 

दरम्यान, संशयित बांधकामांची ऑडिट करण्याचे आदेश मुंबईला महापालिकेला दिले असून अनधिकृत हॉटेल्स पाडण्यात येतील, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

Google+ Linkedin