घरपोच दारु देण्याचा कुठलाही विचार नाही; मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मुंबई | घरपोच दारु देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. असा कुठलाही निर्णय घेण्यात येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. 

ड्रंक अँड ड्राईव्हमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सरकार घरपोच दारु पोहोचवण्याला परवानगी देणार असल्याचं वृत्त होतं. महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना तसे संकेत दिले होते. 

याबाबतचं वृत्त सोशल मीडियात वेगानं व्हायरल झालं. समाजसेवी संघटनांनी यावर आक्षेप घेतला. सोशल मीडियावर सरकारला टीकेचा सामना करावा लागला. 

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या मुद्द्यावरुन घुमजाव केलं आहे. अद्याप असं कुठलंही धोरण आखलेलं नाही, असं त्यांनी म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-आयुषमान खुरानाच्या कॅन्सरग्रस्त पत्नीलाही आला #MeToo चा धक्कादायक अनुभव

-पुतळे उभारणे, त्यांच्या उंचीवरून भांडण्यातच आपल्याला समाधान- पुरंदरे

-शिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात; सामनातून भाजपवर निशाणा

-…तर दानवेंचा लंगोटही शिल्लक राहणार नाही- बच्चू कडू

-आबा तिकडं तिकीट मिळत नसेल तर इकडं या; रामदास आठवलेंचं आमंत्रण

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या