…ही तर शुद्ध राजकीय बदमाशी, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फटकारलं!

मुंबई | राजकीय स्वार्थासाठी फेरीवाल्यांविरोधात आक्रमक आंदोलनं केली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ते एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते. 

फेरीवाला प्रश्नाला मराठी-अमराठी असा रंग दिला जातोय. ही शुद्ध राजकीय बदमाशी आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मात्र त्यांनी राज ठाकरेंचं नाव घेतलं नाही. 

शिवसेनेच्या अल्टिमेटमला काडी किंमत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दाखवून दिलं. मिलिंद नार्वेकरांकडे चिठ्ठी देऊन मला अल्टिमेटम देण्याइतके वाईट दिवस आले नाहीत, असंही ते म्हणाले.