Top News

…त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’वर सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा

मुंबई | पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय पूजा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुंबईतील ‘वर्षा’ या निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली. मुख्यमंत्र्यांनी या पूजेचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 

मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या शासकीय पूजेला विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला होता. 

विठ्ठलाच्या पूजेत खंड नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली. जाधव या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठलाची पूजा झाल्याचा मला विशेष आनंद आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडली विठ्ठलाची शासकीय महापूजा

-विठ्ठलानं मुख्यमंत्र्यांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी!

-मोदी सरकारची उलटगणती सुरू झालीय; सोनिया गांधींचा हल्लाबोल

-आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या नाहीत; धोनीचा खेळाडूंना दम

-मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे ‘यांना’ मिळणार विठ्ठलाच्या पुजेचा मान!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या