प्रस्ताव आला तर मीही शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेईन- मुख्यमंत्री

मुंबई | उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने शहरांची नावं बदलण्याचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नामांतराचं समर्थन केलं आहे. 

मला महाराष्ट्रातील एखाद्या शहराचं नाव बदलण्याचा प्रस्ताव आला तर मी नाव बदलण्याचा निर्णय घेईन. फक्त त्यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी असायला हवी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

कलकत्ताचे कोलकाता, मद्रासचे चेन्नई असं नामकरण केलं आहे. 5 हजार वर्षांचा इतिहास असलेल्या शहराचे नाव ‘प्रयागराज’चा ठेवले तर काय चुकले?, असा सवाल देखील त्यांनी विचारला.

दरम्यान, याचवेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या सेल्फीचं समर्थन केलं. क्रूझ कॅप्टनच्या परवानगीनेच अमृताने सेल्फी घेतल्याचं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘टीव्ही’वरील लाईव्ह चर्चेत भाजप आणि काँग्रेस नेते एकमेंकाना भिडले

-मुख्यमंत्र्यांनी ज्या योजनेमुळे पाठ थोपटून घेतली ती योजना फसली आहे- धनंजय मुंडे

-मुख्यमंत्री आणि गडकरींना शिव्या देणारा पोलिस कर्मचारी निलंबित!

-जलसंधारण मंत्री राम शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत केली न्याहारी

-#MeToo | आणखी एका अभिनेत्रीचा लैगिंक शोषणाचा आरोप