पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, मोहिते पाटील आणि आमचं आधीच ठरलंय!

पुणे | मोहिते पाटील आणि आमचं आधीच ठरलंय, त्यांना कुठे सामावून घ्यायचं हे आम्ही आधीच त्यांच्याशी बोललो आहे. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  म्हटलं आहे. रणजितसिंह आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याचं बोललं जातंय.

माढा लोकसभा मतदारसंघाच्या विजयात त्यांचा वाटा मोठा आहे, त्यामुळे त्यांना कुठे सामावून घ्यायचं याबाबत विचार झाला असल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलंय.

आज मंत्रिमंडळ विस्तार झाला ज्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, मोहिते पाटील यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र त्यांना मंत्रीपद मिळाले नाही.

दरम्यान, नीरेच्या पाण्यावरुन चाललेल्या वादावर विचारलं असता, उदयनराजे भोसले हे राजे आहेत आणि मी प्रजा आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या विषयाला बगल दिली.

महत्वाच्या बातम्या

-रोहित शर्माने पाकला दाखवला हिसका; झळकावलं बहारदार शतक

-#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली!

-पाकविरुद्ध रोहित शर्माची बॅट तळपली; एवढ्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक

-लांडगे-जगताप ‘वंचित’; मुख्यमंत्र्यांनी बाळा भेगडेंना दिला मंत्रिपदाचा नजराणा

-काँग्रेसचा ‘हा’ आमदार म्हणतो, मी पुन्हा आमदार व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या