बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकरी आत्महत्या तुमच्याच काळात सुरू झाल्या; मुख्यमंत्र्यांचा पवारांच्या पलटवार

मुंबई | शरद पवार सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत असं ते सांगत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणाच्या काळात सुरू झाल्या?, तुमच्याच सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांना सुरूवात झाली, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राज्याचा दौरा करत आहेत. यादौऱ्यादरम्यान शरद पवार विविध मुद्द्यांवर सरकार धारेवर धरत आहेत. शेतकरी आत्महत्यांबाबतच्या प्रश्नांवरून ते सरकारला प्रश्न विचारत आहेत. 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं पवारांनी म्हटलं आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या  अजित पवार राज्यात मंत्री होते. शरद पवार कृषीमंत्री होते. विदर्भाच्या वाट्याचा पैसा भ्रष्टाचार करून तुम्ही पळवला, असा आरोपही त्यांनी पवारांवर केला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात राष्ट्रवादी आवाज उठवताना दिसत आहे. तर भाजपकडूनही त्याला तोडीसतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे.

भाजपचं ट्वीट-

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More