मुंबई | आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात जाऊन शहरातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
सध्या नाल्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नाले दुथडी भरून वाहत आहेत, अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे नाले सफाई झाली नाही, असं प्राथमिकदृष्ट्या म्हणता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
काल महापौरांनी मुंबई तुंबली नसल्याचा दावा केला होता. यावर बोलताना आता त्यांच्या वक्तव्यावर कमेंट करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुढच्या दोन दिवसात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आज शाळा महाविद्यालयांसह कार्यालयांनादेखील सुट्टी जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिवसेनेने ‘करुन’ नाही तर ‘भरुन’ दाखवलं- धनंजय मुंडे
-आदित्य ठाकरे म्हणतात ही नैसर्गिक स्थिती; मुंबई महापालिकेला दोष देऊ नका
-मालाड दुर्घटना पालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात- संजय राऊत
-गरज असेल तरच घराबाहेर पडा; प्रशासनाचं पुणेकरांना आवाहन
-मुंबईत पावसाने करुन दाखवलंय; ‘मातोश्री’जवळ तुंबलं पाणी
Comments are closed.