Loading...

“मी जर तोंड उघडलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही”

मुंबई | मला ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका असं सांगण्यासाठी सरकारच्यावतीने फोन आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं नका असं करु, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शरद पवारांनी केलेला दावा हा धादांद खोटा आहे. मी जर तोंड उघडलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Loading...

मी शरद पवारांना कधीच फोन केला नाही की, तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. काही फोन मला आले त्याबद्दल जर मी सांगितलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मी काही राजकीय औचित्य पाळणारा माणूस आहे. राजकीय नितीमत्ता पाळणाऱ्यापैकी आहे. म्हणून मी त्याबद्दल बोलणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...