बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गाडी चालवत पंढरपुरला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्याही पाहाव्यात”

अमरावती | गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्रात पावसाला पुन्हा एकदा सुरूवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे व दरड कोसळल्यामुळे अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे.

कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभुमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच नवनीत राणा या गेल्या 3 दिवसांपासुन अमरावतीच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.

भर पावसात नवनीत राणा यांनी अमरावतीत पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपुस केली. यावेळी ‘गाडी चालवत पंढरपुरला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्याही पाहाव्यात’, अशा शब्दात नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

चिखल तुडवत खासदार नवनीत राणा या शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना एकुणच गंभीर परिस्थिती पाहुन अश्रु देखील अनावर झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवत विदर्भात येऊन येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, त्याशिवाय नुकसानीची तीव्रता कळणार नाही, असं खासदार नवनीत राणा यांनी बोलताना म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

27 जुलैबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

भास्कर जाधवांना एवढा माज कसला?, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांनी हात जोडणं भास्कर जाधवांना रुचलं नाही, पळत जाऊन म्हणाले…

चिपळूणमध्ये मदत मागणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांनी हात उगारला, पाहा व्हिडीओ

“मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का हे एकदा पाहावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More