CM Eknath Shinde | राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिलांकडून योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे.
या योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील राज्य सरकारने योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. आज (17 जुलै) मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडक्या भावांसाठीही खास योजनेची घोषणा केली आहे.
एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
यामध्ये 12 वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत.
हे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अॅप्रेटिशीप करतील, तिथे त्यांना कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकऱ्या मिळतील. एक प्रकारे आपण कुशल कामगार तयार करत आहोत. यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम… https://t.co/yqiDz58MG1 pic.twitter.com/jI3qB1Xnp4
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 17, 2024
12 वी झालेल्यांना महिन्याला 6 हजार
तसेच, उद्योग, कारखाने आणि कंपन्यांत हे युवक अॅप्रेटिशीप करतील आणि त्यांना महिन्याला भत्ता सरकार देणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. याचबरोबर मुलींसाठी 100 टक्के मोफत उच्च शिक्षणाची सोय आपण केली आहे. शेतकऱ्यांसाठीही विविध योजना सरकारच्या माध्यमातून होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) म्हटलं.
दरम्यान, आषाढी एकदशीनिमित्त बा पांडुरंग आणि वारकरी माऊलींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन करत भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. “राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे, शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची सुबत्ता येऊदे, राज्यातली मायमाऊली आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊदे, समाजातली एकजूट, बंधुत्वाची भावना कायम राहूदे, महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे,” असं साकडंही अजित पवार यांनी पांडुरंगाला घातलं आहे.
News Title – CM Eknath Shinde announced the scheme for beloved brother
महत्त्वाच्या बातम्या-
अशा महिलांपासून राहा लांब, नाहीतर व्हाल बर्बाद
प्रशिक्षक होताच गौतम गंभीरची विराट आणि रोहितला तंबी, म्हणाला…
IAS पूजा खेडकर यांची 3 तास पोलीस चौकशी, धक्कादायक माहिती समोर
मोठी बातमी! निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुनेत्रा पवार दिसल्या शरद पवारांच्या मोदीबागेत
बीसीसीआयच्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मोठी मागणी!