बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न, शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

सोलापूर | महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश अशा चार पिढ्या एकत्र होत्या. चारही पिढ्यांच्या हस्ते पूजा करणारे एकनाथ शिंदे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. मुख्यमंत्र्यांसोबत बीड जिल्ह्यातील गेवराई येथील नवले दाम्पत्याला या शासकीय महापूजेचा मान मिळाला.

मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले यांनी मुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजा केली. विठ्ठलाच्या पूजेसाठी एकनाथ शिंदे शनिवारी रात्री उशिरा पंढरपूरात दाखल झाले होते. शिंदे यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शासकीय विश्रामगृहात एका कार्यक्रमानंतर शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय पहाटे विठ्ठल मंदिरात दाखल झाले आणि शासकीय महापूजा पार पडली.

राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. शिंदे यांनी या दौऱ्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. आयोगाने काही अटी शर्ती ठेवत परवानगी दिली आहे. पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही निधी किंवा विकास योजनांची घोषणा करु नये. सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या नियमानुसार परवानग्या घ्याव्यात अशा स्वरुपाच्या काही अटी राज्य निवडणूक आयोगाने घातल्या आहेत.

शासकीय महापूजा पार पडल्यानंतर पहाटे इस्कॉन मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांचा शिवसेना पक्ष मेळावा आहे.

थोडक्यात बातम्या –

आलियाच्या प्रेग्नंसीबाबत करण जोहरने केला मोठा खुलासा!

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

“शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे”

अमरनाथ घटनेवर अक्षय कुमारने व्यक्त केलं दुःख, म्हणाला…

खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी एकमेकींना धुतलं, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More