“धनदांडग्याची मुले असो किंवा राजकारण्यांची..”; ‘हिट अँड रन’ प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य

CM Eknath Shinde | राज्यात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी हिट अँड रनच्या घटना घडल्या आहेत. काल, 7 जुलैरोजी मुंबईत तर पहाटेच एका महिलेला भरधाव कारने फरफटत नेल्याची घटना घडली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शिंदे गटाच्या उपनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह ही कार चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणी पोलिसांकडून सध्या कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणावर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठं भाष्य केलंय. त्यांनी एक ट्वीट केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं?

महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काही धनदांडगे, राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde)  दिला आहे.

सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘हिट अँड रन’ सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय देण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी व आमचे शासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबिंयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. असं ट्वीट मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय.

News Title – CM Eknath Shinde on Hit And Run case   

महत्त्वाच्या बातम्या-

“..तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रजांचे तळवे चाटत होते”; जावेद अख्तर भडकले

पुण्यात झिका व्हायरसने घातलयं थैमान; आढळले ‘इतके’ रुग्ण

मुंबईत पावसाचं थैमान! ‘या’ भागांना बसला सर्वाधिक फटका, शाळा-महाविद्यालयातही पाणीच पाणी

“सरकार कमिशनखोरीत अडकलंय, पहिल्याच पावसात यांनी मुंबई तुंबून दाखवली”

ब्रेकिंग! पुण्यात भरधाव वेगाने 2 पोलिसांना चिरडलं; एकाच मृत्यू तर…