‘उद्धव ठाकरेंना भेटणार का?’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबई | शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला घेऊन भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तर दुसरीकडे शिंदे गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर देखील दावा ठोकला आहे. शिंदे यांचे सरकार आणि स्वत: शिंदे शिवसेनेला एकामागून ऐक असे धक्के देत आहेत. त्यामुळे शिवसेनेला उतरती कळा लागली आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षप्रमुखांना भेटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावर आता शिंदेंनी भाष्य केले आहे. दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या सहकार्याची आवश्यकता असते, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांना भेटणार का? खातेवाटप केव्हा होणार, या प्रश्नांवर त्यांनी ‘लवकरच’ येवढीच माफक प्रतिक्रिया दिली.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वसामान्यांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. यात केंद्र सरकार आपल्या पाठिशी रहावे यासाठी आम्ही दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. ठाकरेंना केव्हा भेटणार या प्रश्नावर त्यांनी लवकरच अशी प्रतिक्रिया देत ते तिथून निघाले.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी सन्मानाने बोलावले तर नक्की जाऊ असे म्हटले होते. मात्र, आजूबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावे असा सल्लाही केसरकरांनी दिला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या –
आलियाच्या प्रेग्नंसीबाबत करण जोहरने केला मोठा खुलासा!
अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस
“शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे”
अमरनाथ घटनेवर अक्षय कुमारने व्यक्त केलं दुःख, म्हणाला…
Comments are closed.