बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांसाठी खुशखबर; हेल्मेटसक्तीची रस्त्यावरील कारवाई थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुणे | पुणे शहरात पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्मेट सक्ती विरोधात आज पुण्यातील आमदारांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. तातडीने ही कारवाई थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावरील कारवाईला स्थगितीचे आदेश दिले आहेत.

हेल्मेटसक्ती कायम आहे. फक्त आता रस्त्यावर दंडवसुली होणार नाही. जे हेल्मेट घालणार नाहीत त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद करुन त्यांच्या घरी दंड पाठवला जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आमदार योगेश काळे, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक यांनी हेल्मेट कारवाई थांबविण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात हेल्मेट न घातल्याने नागरिकांकडून दंड आकारला जात आहे. या प्रकाराने पुणेकर नागरिक त्रस्त झाले आहेत.

पुण्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पुण्याच्या हेल्मेटच्या कारवाईवर मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केली.

 

महत्वाच्या बातम्या

-जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली; बच्चू कडूंचा तावडेंवर हल्लाबोल

-जे शिक्षण आमदाराचा मुलगा घेतो तेच शिक्षण गरिबाच्या मुलाला मिळालं पाहिजे- बच्चू कडू

-राष्ट्रवादीचे ‘राजे’ शिवबंधनात अडकणार? चर्चांना उधाण

-एकवीस, बावीस नव्हे, वीस एक, वीस दोन म्हणा; उजळणीत बालभारतीकडून धक्कादायक बदल

-मुख्यमंत्र्यांना सत्तेची गुर्मी; विजय वडेट्टीवारांचा घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More