खडसेंचं पुनर्वसन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही- मुख्यमंत्री

नागपूर | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं पुनर्वसन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांशी संवाद साधताना खडसेंचं पुनर्वसन होणार का?, या प्रश्नावर, पुनर्वसन विस्थापितांचं केलं जातं, खडसे प्रस्थापित नेते आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. 

दरम्यान, भूखंड घोटाळ्याच्या आरोपाखाली खडसे यांनी मंत्रिपद गमवावं लागलंय.