मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवारी जाहीर केला आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसने आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले आशिष देशमुख हे उमेदवार असणार आहेत.
मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस कोणत्या नेत्याला संधी देणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र पक्षाने आशिष देशमुख यांच्या नावाचा विचार केला आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ही काँटे की टक्कर संपूर्ण राज्याला अनुभवता येणार आहे.
नागपूर दक्षिणमधून मुख्यमंत्र्यांचं पारडं जरासं जड मानलं जात आहे. मात्र आशिष देशमुख हे कधी काळी भाजपमध्येच होते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि भाजपचे डावपेच देशमुख चांगलेच ओळखून आहेत.
दरम्यान, काँग्रेसने पहिल्या यादीत 51, दुसऱ्या यादीत 52, तिसऱ्या यादीत 20 आणि चौथ्या यादीत 19 असे एकूण 140 जाहीर केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर त्यांचं स्वागतच” – https://t.co/isu8V8tXg9 @ChhaganCBhujbal @EknathKhadseBJP
— थोडक्यात (@thodkyaat) October 3, 2019
कितीही चांगला मेकअप केला तरी खरा चेहरा लपवता येणार नाही; रितेश देशमुखांची टीका https://t.co/WlMN7uNdeo @BJP4Maharashtra @INCMaharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 3, 2019
“मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या कामांसाठी गृहखात्याला राबविलं” – https://t.co/NOb8cRw4Db @ChakankarSpeaks @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) October 3, 2019
Comments are closed.