शिंदेंना ‘गद्दार’ म्हणणाऱ्या कुणाल कामरावर मुख्यमंत्री संतापले, म्हणाले…

CM Fadnavis on Kunal Kamra Controversy

Kunal Kamra Controversy | स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कामराने केलेल्या विधानांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. (Kunal Kamra Controversy)

“स्वातंत्र्याला मर्यादा हव्यात” – फडणवीस

कुणाल कामराने (Kunal Kamra) आपल्या शोमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर अप्रत्यक्षपणे केलेल्या विडंबनात्मक टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं, “स्टँडअप कॉमेडी करणे हा अधिकार आहे, पण त्या नावाखाली दुसऱ्यांचा अपमान करणे योग्य नाही.”

फडणवीस पुढे म्हणाले, “स्वातंत्र्याचा गैरवापर करून अशा थेट टीका करणं हे अत्यंत खालच्या दर्जाचं विनोद आहे. ज्यांच्याबद्दल राज्याच्या जनतेत आदर आहे, अशा नेत्यांना गद्दार म्हणणे अक्षम्य आहे. महाराष्ट्रातील जनतेने 2024 च्या निवडणुकीतच दाखवून दिलं आहे की कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार.”

“कायदेशीर कारवाई होईल, माफी मागा” – फडणवीसांचा इशारा

फडणवीसांनी कामराच्या संविधान दाखवणाऱ्या पोस्टवरही टीका करत म्हटलं, “संविधानाने स्वातंत्र्य दिलं आहे, पण त्याला मर्यादा आहेत. कुणीही उठून कुणालाही गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही.” त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “कामराने या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.”

फडणवीसांनी हेही सांगितलं की, “जो व्यक्ती जनतेकडून निवडून आला आहे, ज्याच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी आणि वारसा आहे, त्याच्यावर अशा प्रकारे विडंबन करून अपमान करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही.”

पुढे त्यांनी असा इशारा दिला की, “कॉमेडीच्या नावाखाली मुद्दाम एखाद्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्याचं काम कोणी करत असेल, तर त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.” फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे कामराच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Title : CM Fadnavis on Kunal Kamra Controversy

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .