मुंबई | गरज पडली तर मी पी.ए. किंवा ड्रायव्हरकडून उसने पैसे घेतो, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान केलं आहे.
‘भारतीय डिजीटल पार्टी’ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी त्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
मुख्यमंत्री आहात म्हणून कोणत्या गोष्टी करता येत नाहीत?, त्वरीत डायल लिस्टमध्ये कोणा-कोणाचे नंबर आहेत? सोशल मिडीयावर कोणाला जास्त फॉलो करता?, असे एक ना अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले आणि त्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनीही तितक्याच खुमासदार पद्धतीने उत्तरं दिली.
दरम्यान, कधीही न व्यक्त झालेल्या विषयांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी करत मुलाखतीत चांगलाच रंग भरला.
पाहा मुख्यमंत्र्यांची रंगलेली आगळी वेगळी मुलाखत-
महत्वाच्या बातम्या-
–मोदींसाठी 5 रूपये द्या, ‘फंड’ जमविण्यासाठी भाजपचा नवा ‘फंडा’!
–हाडाच्या शेतकऱ्याने केक कापून साजरा केला बैलाचा वाढदिवस!
–…तर त्या 5 अधिकाऱ्यांना ‘बंगालभूषण’ पुरस्कार देणार- ममता बॅनर्जी
–राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘यांचं’ नाव चर्चेत!
–मुंबई महानगरपालिकेच्या 20 नगरसेवकांचं पद रद्द, मात्र एकही गुन्हा दाखल नाही!