मुख्यमंत्री वाचले, हेलिकॉप्टर अपघात होता होता टळला

मुंबई | मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टरच्या मार्गात केबल आल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदरमध्ये घडला. सुदैवाने चालकाने सावधानता बाळगत हेलिकॉप्टर वर नेल्याने संभाव्य अपघात टळला.

हेलिकॉप्टर आणखी खाली आलं असतं तर पंख्यामध्ये केबल अडकून अनर्थ ओढवला असता. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील होते. 

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर यापूर्वी 3 वेळा विघ्न आलं होतं. यापूर्वी लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. त्यानंतर रायगडमध्ये आणि नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमुळे मुख्यमंत्र्यांवर विघ्न निर्माण झालं होतं.